Murder (file image)

Latur Shocker:  महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात एका मानसिक दृष्ट्या विकलांग असलेल्या व्यक्तीने आपल्या 69 वर्षीय आईची हत्या केली आहे. 12 वर्षापासून आरोपी मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. लातूर येथील वाल्मिकी नगर येथे मंगळवारी दुपारी ही घटना घडली अशी माहिती एमआयडीसी परिसरतील पोलिसांनी दिली. (हेही वाचा- दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीची हत्या; आरोपी पतीला अटक, गोरेगाव येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर येथील वाल्मिकी नगर येथे ही घटना घडली. प्रभावती कंदळे यांची हत्या करण्यात आली आहे. प्रभावती यांची मुलगी पूनमचंद्र या खोलीत जेवण घेऊन गेल्या होत्या दरम्यान त्या रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्या. डोक्यात काठीने मारहाण केल्याचे दिसून आले. दरम्यान वृध्द महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणी एमआयडिसीचे पोलिस अधिकारी तपास करत आहे. या घटनेची माहिती गावात पसरताच शोककळा पसरली आहे. सहाय्यक निरिक्षक शिवाजी देवकाते या प्रकरणात तपासणी करत आहे. त्यांनी सांगितले की  आरोपी मानसिक दृष्ट्या विकलांग आहे. त्याच्यावर 2011 पासून रुग्णलायात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी पुढे सांगितले की, वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयात ठेवले आहे आणि न्यायालयात याची माहिती दिली आहे.