उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक
उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे हाल होणार (Photo Credits-Facebook)

उद्या (18 ऑगस्ट) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी उद्या रेल्वेच्या वेळापत्रकानुसार घरातून बाहेर जाण्याचे नियोजन करावे. मेगाब्लॉकमुळे नागरिकांचे हाल होतात पण रेल्वेच्या काही कामांमुळे ब्लॉक घेण्यात येतो. तर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, कुर्ला-वाशी आणि मांटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी 9.52 ते दुपारी 2.42 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळण्यात आल्या आहेत. तसेच ब्लॉक दरम्यान सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत लोकल 15-20 मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कुर्ला-वाशी स्थानकातील लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर लोकच्या विशेष फेऱ्या सुरु राहणार आहेत.(खुशखबर! मुंबई-पुणे रेल्वे सेवा पुन्हा सुरु; मेटाकुटीला आलेल्या प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास)

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट-मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत असणार आहे. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच काही लोकल फेऱ्या रद्द केल्याने थोड्या उशिराने धावणार आहेत.

तसेच आज रात्रकालीन ब्लॉक चर्चगेट ते मरिन लाइन्स दरम्यान घेण्यात येणार आहे. यावेळी पादचारी पुलाचे काम करण्यासाठी आजा आणि उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्रकाली ब्लॉक हा रात्री 1 ते पहाटे 4.30 पर्यंत असणार आहे. त्यामुळे रात्री 11.55 ला सुटणारी विरार-चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रल पर्यंतच धावणार आहे.