Mega Block Update: तुम्ही ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक (Jumbo Mega Block) असणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 05, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक (Mega Block) असणार आहे. या मेगाब्लॉकमध्ये शंभरहून अधिक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय 350 लोकल ट्रेनही धावणार नाहीत. हा जंबो मेगा ब्लॉक ठाणे ते दिवा स्थानकादरम्यानच्या पाचव्या मार्गावर आणि अप जलद मार्गावर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यानच्या सहाव्या मार्गावर असेल. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या 3 दिवस बंद राहणार आहेत.
मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी आतापर्यंत अनेक मोठे जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. मात्र, अद्याप दोन मेगाब्लॉक शिल्लक असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले होते. 22 आणि 23 जानेवारीला पहिला मेगाब्लॉक घेण्यात आला. 5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी होणारा दुसरा मेगाब्लॉक 72 तासांचा आहे. या दोन मेगाब्लॉकनंतर पाचव्या आणि सहाव्या मार्गिका कार्यान्वित होतील, असे एमआरव्हीसीने सांगितले. (वाचा - Mumbai 1993 Serial Blast: मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला यूएईमधून अटक, मुंबई बॉम्बस्फोटानंतर होता फरार)
350 लोकल ट्रेनही रद्द -
या मेगाब्लॉकमध्ये शंभरहून अधिक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यादरम्यान 350 लोकल ट्रेनही धावणार नाहीत. हा मेगा ब्लॉक ठाणे ते दिवा स्थानकादरम्यानच्या पाचव्या मार्गावर आणि अप जलद मार्गावर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यानच्या सहाव्या मार्गावर असेल. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या 3 दिवस बंद राहणार आहेत. यावेळी प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.
पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील पायाभूत सुविधांच्या कामासाठी ठाणे – दिवा फास्ट लाईनवर ७२ तासांचा ब्लॉक
5 फेब्रुवारी 2022 रोजी (शुक्रवार/शनिवार मध्यरात्री) 00.00 वाजल्यापासून 7 फेब्रुवारी 2022 रोजी (सोमवार/मंगळवार मध्यरात्री) 24.00 वाजेपर्यंत.
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा 👇 pic.twitter.com/9Dyi4Z7Bxu
— Central Railway (@Central_Railway) February 4, 2022
या एक्स्प्रेस गाड्या रद्द -
तेजस, जनशताब्दी, एसी डबल डेकर आणि कोचुवेली, मंगलोर, हुबळी एक्सप्रेस गाड्या 5, 6 आणि 7 फेब्रुवारीला बंद राहतील. डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जनशताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस यासह अनेक गाड्या तीन दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.
याशिवाय दिवा ते वसई दरम्यान धावणाऱ्या मेमू गाड्याही या काळात बंद राहणार आहेत. त्यामुळे सर्व जलद गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.