Mumbai Mega Block on Sunday, June 30, 2024: रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी रेल्वे रुळांच्या देखभालीचे आणि विविध आंत्रिकीकरणाची काम केली जात असतात. जेणेकरून उर्वरित आठवड्याच प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नयेत. रविवारी 30 जून रोजी मध्य रेल्वेने ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर आणि पनवेल ते वाशी स्टेशनदरम्यान ब्लॉक जाहिर केला आहे. (हेही वाचा- लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक; प्रवासाचे नियोजन करण्याआधी वेळापत्रक पहा)
पश्चिम रेल्वेने बोरिवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे. या काळात रेल्वे रुळ आणि सिग्नल्सची देखभाल आणि दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत. त्यामुळे काही लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल उशिराने धावणार आहे अशी माहिती रेल्वे विभागाकडून मिळाली आहे. त्यामुळे वेळापत्रक पाहूनच प्रवाशांनी निघावे. ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 पर्यंत ब्लॉक असेल. पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत मेगाब्लॉंक असणार आहे.
बोरीवली स्थानकापासून ते राम मंदिर स्थानकापर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजे पर्यंत ब्लाॉक असणार आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते पनवेल / बेलापूर आणि ठाणे ते पनवेल या दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी स्थानक ते वाशी, ठाणे ते वाशी, नेरुळ , बेलापूर - नेरूळ आणि उरण या दरम्यान लोकल ट्रेन उपलब्ध होणार.