Mumbai Local Mega Block : लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक; प्रवासाचे नियोजन करण्याआधी वेळापत्रक पहा

लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक(Mega Block) घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे रविवारी घराबाहेर पडण्याआधी नागरिकांनी वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करावे.

Mumbai Local Mega Block : लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक; प्रवासाचे नियोजन करण्याआधी वेळापत्रक पहा
मुंबई लोकल ट्रेन (Photo Credits: PTI)

Mumbai Mega Block : उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega Block) दरम्यान, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यात येणार आहेत. या मेगा ब्लॉकमुळे हार्बर रेल्वे(Harbor Railway), पश्चिम रेल्वे (Western Railway)आणि मध्य रेल्वे ( Central Railway)च्या लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे तुम्ही जर फिरायला जाणार असाल तर रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा.

मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मार्गावर माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटीहून ठाण्याकडे सुटणाऱ्या आणि सीएसएमटी येथे जाणाऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. त्यामुळे लोकल सेवा १५ मिनिटे विलंबाने धावतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक 

पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रूझ – गोरेगावदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. या काळात सांताक्रूझ – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत.त्याचबरोबर ब्लॉक कालावधीत काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक 

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द अकरण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल – वाशी यादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत ठाणे, वाशी, नेरूळ रेल्वे स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी असेल.

(The above story first appeared on LatestLY on May 12, 2024 08:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).