Mumbai Local | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

मुंबई लोकलच्या (Mumbai Local) मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर रविवारी (24 ऑक्टोबर) सकाळपासून देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉग (Mega Block) घेण्यात येणार आहे. मध्ये रेल्वे मार्गावरील ठाणे आणि कल्याण दरम्यान अप-डाऊनच्या स्लो लाईनवरील सेवा सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहतील. मुलुंड आणि कल्याण दरम्यान फास्ट लाईनवरुन रेल्वे सेवा चालू राहील. या फास्ट लाईनवर ठाणे, दिवा आणि डोंबिवली या स्थानकांवर ट्रेन थांबतील.

कल्याणवरुन 10.37 पासून 3.41 पर्यंत स्लो लाईनवरुन सुटणाऱ्या सर्व गाड्या फास्ट मार्गांवर वळण्यात येतील आणि मुलुंडनंतर ट्रेन्स पुन्हा स्लो मार्गांवर चालतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरुन सुटणाऱ्या आणि टर्मिनल्सकडे जाणाऱ्या सर्व गाड्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान उशीराने धावतील. (हे ही वाचा: Mumbai Local Update: 18 वर्षांखालील सर्व विद्यार्थ्यांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा)

हार्बर लाईनवर पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 मध्ये अप आणि डाऊन दोन्ही सेवा बंद असतील. मेगाब्लॉक काळात सीएसटी ते वाशी दरम्यान स्पेशल ट्रेन्स सोडण्यात येतील. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान सकाळी 9.01 ते संध्याकाळी 5.53 या काळात डाऊन सर्व्हिसेस बंद असतील. ट्रान्स हार्बरवर ठाणे-वाशी आणि ठाणे-नेरुळ या सेवा नियमित प्रमाणे चालतील.

खारकोपर मार्गावर नेरुळवरुन सुटणाऱ्या सर्व गाड्या सकाळी 10.15 ते दुपारी 2.45 दरम्यान बंद राहतील. तर खारकोपरवरुन सुटणाऱ्या गाड्या सकाळी 10.45 ते दुपारी 3.15 दरम्यान बंद राहतील. परंतु, बेलापूर ते खारकोपर दरम्यान सर्व लोकल्स आपल्या वेळेनुसार चालतील. दरम्यान, दर रविवारी लोकलच्या देखभाली आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मुंबई लोकलच्या विविध मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येतो.