मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आजपासून तीन दिवसांचा ब्लॉक, सकाळी दहा वाजता होणार सुरवात
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

पावसाळा सुरु होण्याच्या आधी सुरक्षा हेतूने पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावरील (Pune- Mumbai Expressway)  दरड हटविण्याच्या कामाला आज सकाळी दहा वाजता सुरवात होणार आहे. 21 मे ते 23 मे या कालावधीत या कामाचा दुसरा टप्पा पार पडेल यामुळे येत्या तीन दिवसात एक्सप्रेस वे वर दर तासाला पंधरा मिनितणांचा ब्लॉक घेण्यात येईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) तर्फे हे काम करण्यात येणार असून यासाठी एक्स्प्रेस वेवर तळेगाव टोलनाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारला जोडणाऱ्या मार्गिकेवरील उर्से खिंड (Urse-Khind) येथे दरड आणि मोठे दगड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर तब्बल 15 दिवस मेगाब्लॉक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

पुणे विभाग महामार्ग सुरक्षा दलाचे पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.या कामाचा पहिला टप्पा हा सुरळीत पार पडला असून दुसऱ्या टप्प्यात देखील नियोजित मार्गावरील दरड कोसळणाऱ्या प्रवण क्षेत्रांमध्ये स्केलिंगचे काम चालू असल्याने, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक्सप्रेस मार्गावर दररोज सकाळी 10 ते दुपारी 4:15 पर्यंत 15 मिनिटांसाठी 6 वेळा हा मेगा ब्लॉक असणार आहे.

असं असेल ब्लॉकचं वेळापत्रक

1) पहिला ब्लॉक - 10.00 ते 10.15

2) दुसरा ब्लॉक - 11.00 ते 11.15

3) तिसरा ब्लॉक - 12.00 ते 12.15

4) चौथा ब्लॉक - 02.00 ते 02.15

5) पाचवा ब्लॉक - 03.00 ते 03.15

6) सहावा व शेवटचा ब्लॉक - 04.00 ते 04.15

येत्या तीन दिवसात घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे वाहनचालकांची थोडी गैरसोय होऊ शकते त्यामुळे आवश्यक असल्यास हे ब्लॉकचे वेळापत्रक पाहून मगच प्रवासाला निघावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.