महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ पुणे, यांच्यातर्फे मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Express Way) 16 एप्रिल पासून 5 मे 2019 पर्यंत शनिवार, रविवार व सुट्टीचा दिवस वगळता 'मेगा ब्लॉक' राहणार आहे. न्यूज18 लोकमत आणि पुणे समाचार यांनी याबाबत वृत्त दिले आहे. अमृतांजन ब्रिज येथे किमी नं. 45/710 ते 45/900, आडोशी येथे किमी 40/780 ते 40/995, खंडाळा येथे किमी 46/935 ते 47/910 आणि भातन बोगदा येथे 46/935 ते 47/910 येथे रस्त्याची कामे चालू असल्याने हा मेगाब्लॉक राहणार आहे. पुणे विभागात 2 ठिकाणी ब्लॉक असणार आहे.
पुणे विभाग महामार्ग सुरक्षा दलाचे पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली. या कालावधी दरम्यान दरड कोसळणाऱ्या प्रवण क्षेत्रांमध्ये स्केलिंगचे काम चालू असल्याने, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक्सप्रेस मार्गावर दररोज सकाळी 10 ते दुपारी 4:15 पर्यंत 15 मिनिटांसाठी 6 वेळा हा मेगा ब्लॉक असणार आहे. (हेही वाचा: आता रस्तेमार्गाने मुंबई ते दिल्ली अंतर पार होणार फक्त 12 तासांत; पहा काय असेल मार्ग)
1) ब्लॉक - 10.00 ते 10.15
2) ब्लॉक - 11.00 ते 11.15
3) ब्लॉक - 12.00 ते 12.15
4) ब्लॉक - 02.00 ते 02.15
5) ब्लॉक - 03.00 ते 03.15
6) ब्लॉक - 04.00 ते 04.15
या 15 दिवसांमध्ये मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांनी हे ब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.