File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

बीएमसी (BMC) कडून सध्या बालरोगतज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, मानसोपचार तज्ज्ञ या पदांसाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. बीएमसीकडून 10 रिक्त पदांवर नोकरभरती केली जाणार आहे. त्यासाठी 6 मे 2022 पर्यंत इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे. दरम्यान यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. हे देखील नक्की वाचा: MPSC Stenographer Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी; 12 मे पूर्वी करा mpsconline.gov.in वर अर्ज .

दरम्यान कंत्राटी पद्धतीने होणार्‍या या नोकरभरती मध्ये सल्लागार पदासाठी ७३,५०० /- रुपये प्रतिमहिना, बालरोगतज्ञ पदासाठी ७५,०००/- रुपये प्रतिमहिना, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पदासाठी ३२,०००/- रुपये प्रतिमहिना, आणि मानसोपचारतज्ज्ञ पदासाठी ७५,०००/- रुपये प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे. विविध पदांसाठी पात्रता निकष वेगळे असणार आहेत. वयोमर्यादा कमाल 45 वर्ष आहे. इथे पहा सविस्तर नोटिफिकेशन.

निवडा प्रक्रियेसाठी मुलाखत घेतली जाणार असून संयुक्त-कार्यकारी आरोग्य अधिकारी (NUHM) कार्यालय एफ/दक्षिण विभाग १ ला मजला रूम. नं. १३ दो. बाबासाहेब रोड, परेल. या पत्त्यावर तुमचा अर्ज सादर करावा लागणार आहे.

बीएमसी मधील या नोकरभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी आपला बायोडाटा, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) व पासपोर्ट साईझ फोटो हे सोबत जोडणे गरजेचे आहे. या पदांसाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत दिली जाईल.