भायखळा राणी बाग बंगल्यात महापौरांचे लवकरच स्थलांतर होणार
महापौर बंगला शिवजी पार्क (फोटो सौजन्य-ट्वीटर)

शिवाजी पार्क येथील पुरातन वास्तु असलेल्या महापौर बंगल्याचा निर्णय अखेर घेण्यात आला होता. तर ऐतिहासिक बंगल्यात आता शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे (Bal Thackeray) स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे भूमिपूजन पुढील आठवड्यात असल्याने महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांनी भायखळा राणी बाग बंगल्यात जाण्याची तयारी सुरु केली आहे.

महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महापौरांच्या निवासस्थानाचा प्रश्न उपस्थित राहिला होता. त्यामुळे मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून त्यांची प्रतिष्ठा जपली जाईल असा बंगला असला पाहिजे असे सांगितले जात होते. तर पालिकेच्या या मागणीकडे राज्य शासनाने दाद न देता अखेर राणी बाग येथील बंगल्यात महापौरांच्या निवासस्थानाची सोय करण्यात आली आहे. (हेही वाचा- भायखळाच्या राणी बाग बंगल्यात राहण्याचा महापौरांचा निर्णय निश्चित)

येत्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर महापौरांच्या परिवाराकडून राणी बागेतील बंगल्याची सुधारणा करण्यात यावी असे सांगितले होते. त्यामुळे आठवड्याभरातच महापौर विश्वनाथ महाडेश्वर राणी बागेतील बंगल्यात राहण्यास जाणार आहेत.