Parth Pawar seen with his granduncle Sharad Pawar. (Photo Credits: ParthPawar/Facebook)

शरद पवारांनी (Sharad Pawar) 'माढा' लोकसभा मतदार संघातून माघार घेत अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार (Parth Pawar) निवडणूकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र सुरूवातीचे कल पाहता मावळ (Maval) मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ पवार पिछाडीवर आहेत. ही पिछाडी सुमारे 44,000 हजार मतांची आहे.पार्थ पवार यांच्या विरोधात युतीचे श्रीरंग बारणे (Shrirang Barne) आहेत.  सध्या एनडीए महाराष्ट्रासह देशभरात आघाडीवर आहेत. एका क्लिकवर पहा काय आहेत महाराष्ट्रसह भारत देशात काय आहेत निकाल?

शरद पवार हे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. मात्र यंदा लोकसभेच्या रिंगणातून माघार घेत राष्ट्रवादीने पार्थ पवारला संधी देण्यात आली होती. मात्र मतदारांनी पार्थ पवारला नाकारलं आहे. राष्ट्रवादीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील प्रचार केला होता मात्र ती कमाल दिसून आलेली नाही. Lok Sabha Election Results 2019: निलेश राणे, शिवसेनेचे अनंत गिते पिछाडीवर; विनायक राऊत, राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे आघाडीवर; पाहा महाराष्ट्रातून कोकण विभागातील मतमोजणी कल

भाजपाला स्वबळावर बहुमत मिळेल असं चित्र दिसत आहे. त्यामुळे मागील लोकसभा निवडणूकीपेक्षा यंदा भाजपा उमेदवार आघाडीवर दिसत आहेत.