New Mumbai Shocker: मामाने केला 15 वर्षीय भाचीवर बलात्कार; पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीला अटक
Minor Rape Case (Photo Credit- Pixabay)

New Mumbai Shocker: नवी मुंबई (New Mumbai)मध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये (Rape Cases) अलिकडे वाढ होताना दिसत आहे. 15 वर्षीय भाचीवर बलात्कार (Rape)केल्याप्रकरणी नवी मुंबईतील एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. बलात्कारानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली. 34 वर्षीय आरोपी हा मूळचा नवी मुंबईतील नेरूळ (Nerul) येथील असून तो मुलीचा मामा (Maternal Uncle) आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपीने 4 ऑक्टोबर 2023 रोजी घरातचं आपल्या भाचीवर बलात्कार केला. मुलीने नंतर काही आरोग्य समस्यांची तक्रार केली. त्यानंतर तिला शेजारच्या मुंबईतील गोवंडी भागातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे ती गर्भवती असल्याचे समोर आले. (हेही वाचा -School Watchman Rapes 4 Yr Old Student: लाजिरवाणे कृत्य! कांदिवलीत शाळेच्या वॉचमनने केला 4 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपीला अटक)

रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रविवारी आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (वाचा - Mumbai Crime: शिवडीत 40 वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या, आरोपीला अटक)

दरम्यान, आज मुंबईतील कांदिवली भागात एका चार वर्षांच्या चिमुरडीवर शाळेतील वॉचमनने चॉकलेटचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी आज आरोपीला अटक केली आहे.