Mumbai Pune Expressway News: शनिवार-रविवार आणि जोडून आलेला नाताळ, मुंबई पुणे एक्सप्रेसवे वाहतूक कोंडीने गुदमरला
Mumbai Pune Expressway Traffic | (Photo Credit - Twitter)

शनिवार रविवार आणि जोडूनच आलेली नाताळची सुट्टी यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वाहतूक कोंडीने गुदमरला आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर आल्याने मोठी कोंडी झाल्याचे पाहायला मिळते आहे. खास करुन खालापूर-लोणावळा मार्गावर अनेक वाहने तासनतास अडकून पडली आहेत. या वाहतूक कोंडीबाबत माहिती देताना एक चालक म्हणाला “ खालापूर ते लोनावळा पूर्ण मार्ग असाच पद्धतीने जाम झाला आहे. त्यामुळे अनेक गाड्यांचे इंजिन बिघडले आहे. तुम्हाला वाहनांच्या लांबच लांब राहा पाहायला मिळतील.'' दरम्यान, एका इन्स्टाग्राम युजर्सने या वाहतुक कोंडीचा व्हिडिओही चित्रीत करुन अपलोड केला आहे. जो सध्या व्हायरल होतो आहे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता. (हेही वाचा, Tanaji Sawant: आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर घडली घटना)

व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Being Punekar (@beingpunekarofficial)