इमारत | प्रतिकात्मक फोटो |(Photo credit : commons.wikimedia)

शहर औद्योगिक विकास महामंडळाने (CIDCO) सामूहिक गृहनिर्माण योजनेच्या (Mass Housing Scheme 2022) ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. आता ही नोंदणी 24 मार्चपर्यंत करू शकणार आहात, एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. विकास प्राधिकरणाने शुल्क आणि ईएमडी रक्कम भरण्याची अंतिम मुदतही वाढवली आहे आणि त्यानुसार संगणकीकृत ड्रॉ काढली जाणार आहे. सिडकोच्या मास हाऊसिंग स्कीम 2022 ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कागदपत्रे सबमिट करण्यासाठी आणि ईएमडी रक्कम भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.

अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांना यामुळे एक अतिरिक्त विंडो मिळेल, असे  डॉ संजय मुखर्जी, सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणाले. सिडकोने 26 जानेवारी रोजी 5,730 घरांची सामूहिक गृहनिर्माण योजना सुरू केली, ज्याअंतर्गत नवी मुंबईतील झपाट्याने विकसित होणाऱ्या तळोजा नोडमध्ये 5,730 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 5,730 घरांपैकी 1,524 घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध आहेत आणि उर्वरित 4,206 घरे सर्वसाधारण वर्गासाठी आहेत.

सुधारित वेळापत्रकानुसार, यासाठी ऑनलाइन नोंदणी 24 मार्चपर्यंत पूर्ण करता येईल. नोंदणीनंतर, ऑनलाइन अर्ज आणि ऑनलाइन पेमेंट प्रक्रिया 25 मार्चपर्यंत पूर्ण करावी लागेल. स्वीकृत अर्जदारांची प्रारूप यादी 31 मार्च रोजी प्रसिद्ध केली जाईल आणि स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी 4 एप्रिल रोजी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. या योजनेसाठी संगणकीकृत सोडती 8 एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. (हेही वाचा: NMMC Budget 2022-23: आयुक्तांनी सादर केला नवी मुंबई महापालिकेचा सन 2022-23 सालचा अर्थसंकल्प)

दरम्यान, सिडकोकडून दिवाळी 2021 मध्ये काही नोडमधील सामाजिक उद्देशासह निवासी आणि वाणिज्यिक गळ्यांची विक्री करण्यात आली होती. यामध्ये नवी मुंबई येथील खारघर, पनवले, पुष्पक नगर नोडमधील भूखंड आणि नवी मुंबईच्या रेल्वे स्थानक संकुलासह सिडकोच्या गृहनिर्माण संकुलातील वाणिज्यिक गाळ्यांची विक्री करण्यात आली होती.