नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अंबड (Ambad) येथील एका महिलेने चक्क मेकअप ( Makeup) टीकत नाही या कारणावरुन आत्महत्या केली आहे. अंबड येथील दत्तनगर परिसरात ही घटना घडली. सुंदर दिसत नसल्याने ही महिला नाराज होती. आपण सुंदर दिसावे यासाठी ती सातत्याने मेकअप करत असायची. परंतु, केलेला मेकअप टिकत नसल्याने नाराज झालेल्या या महिले आत्महत्येचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतही तसा उल्लेख असून, डोळ्याला काजळ लावता येत नसल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचा उल्लेखही त्यात आहे. इतक्या क्षुल्लक कारणामुळे महिलेने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.
रुखमा भास्कर खरचाण (वय 27 वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. नुकतेच तिचा विवाह झाला होता. पती आणि आपल्या नव्या कुटुंबासोबत ती दत्तनगर येथील माऊली चौक परिसरात राहात होती. तिचा पती एका कंपनीत कामाला आहे. बुधवारी सकाळी 3.30 च्या सुमारास नेहमीप्रमाणे रुखमा हिचा पती कंपनीत कामाला गेला. दरम्यान, घरी कोणी नसल्याचे पाहून तिने न्हाणीघराच्या छताला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. (हेही वाचा, महाराष्ट्र: मुलाने दिली चिठ्ठी; दहावितील मुलीची आत्महत्या)
दरम्यान, घटनेची माहिती कळताच अंबड पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करुन अकस्मिक मृत्यूची नोंद पोलीस दप्तरी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुखमा हिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी मिळाली असून, त्यात 'केलेला मेकअप टिकत नाही. डोळ्यातून सतत पाणी येते. त्यामुळे लावलेले डोळ्यावर काजळ लावता येत नाही. तसेच, मी सुंदर दिसत नसल्याने आत्महत्या करत आहे', असा उल्लेख या चिठ्ठीत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.