मुख्यमंत्री उद्धव ठाकरे । PC: Twitter/ @InfoAurangabad

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन (Marathwada Mukti Sangram Din) कार्यक्रमाचे औचित्य साधत मराठवाड्यासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने अभिवादन केल्यावर मुख्यमंत्र्यांनी भआषण केले. आपल्या भाषणात त्यांनी मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यात मराठवाड्यासाठी संतपीठ, निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास यांसह राज्य सरकारने खास मराठवाड्यासाठी राबवलेल्या विविध योजनांबाबत माहिती दिली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणा

1. औरंगाबाद जिल्हा परिषदेकडील १४४ निजामकालीन शाळा आणि वर्ग खोल्या नव्यानं बांधणार

2. पैठण येथील संतपीठाचे अभ्यासक्रम सुरू करणार. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे जबाबदारी

3. परभणी येथे 200 बेडसचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

4. उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयाचे कामही वेगाने सुरू

5. सिथेंटीक ट्रॅकचे काम औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल येथे

6. हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटी निधी

7. औरंगाबाद -अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना

8. औरंगाबाद – शिर्डी हवाई सेवेची चाचपणी

9. सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये

10. औरंगाबाद : मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७. २२ कोटी रुपये निधी नगरोत्थानमधून

11. परभणी शहरात भूयारी गटार योजनेच्या कामासही गती. ३५० कोटी रुपये

12. परभणीसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा योजना जल जीवन अभियानातून. १०५ कोटी रुपये

13. उस्मानाबाद शहराची 168.61 कोटी रकमेची भूमीगत गटार योजना

14. औरंगाबाद : १६८० कोटींच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश (हेही वाचा, Marathwada Mukti Sangram Din 2021 Images: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त Greetings, Messages शेअर करुन साजरा करा आजचा दिवस!)

15. हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योग. ४.५० कोटी

16. औरंगाबाद - शिर्डी या ११२. ४० किमी मार्गाची श्रेणीवाढ

17. समृद्धीला जोडणाऱ्या १९४.४८ कि.मी.च्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देणार

18. स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन प्रेरणादायी होईल असे उभारणार

19. औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार

20. मराठवाड्यात येत्या वर्षात जवळपास 200 मेगावॅट सौर प्रकल्प उभारणार

21. औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगाने करावी असे निर्देश

22. घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास. वाढीव २८ कोटी रुपये खर्च

23. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास . 86.19 कोटी रुपये खर्च येईल.

24. नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास. 66.54 कोटी रुपये खर्च.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान सांगितले की, आज ज्यांनी मला धन्यवाद म्हणून बोर्ड दाखवले त्यांना मी इतकेच सांगू इच्छितो की, हा आमचा विकास नाही. आमचा विकास अजून व्हायचा आहे. अजून खूप काही होणार आहे. बोलघेवडे सरकार काही कामाचे नसते, असाही टोला उद्धव ठाकरे यांनी या वेळी लगावला.