आजवर आपल्याला लेखक, उद्योजक आणि वक्ता म्हणून माहिती असलेले मराठमोळे श्री ठाणेदार (Shri Thanedar) हे आता थेट अमेरिकेतील मिशिगन (Michigan) प्रांतात सिनेटर (Senator, आमदार) झाले आहेत. होय, अनेकांसाठी ही धक्कादायक बाब असू शकते. परंतू, वास्तवात असे घडले आहे. श्री ठाणेदार हे अमेरिकेतील डेमेक्रॉटीक (Democrat ) पक्षाकडून आमदार झाले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेत राहूनही ठाणेदार यांची मराठी भाषा (Marathi language ) अस्सल आहे. ते उत्तम मराठीत बोलतात, संवाद साधतात. त्यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. थेट मराठी बोलणारी व्यक्ती अमेरिकेत आमदार होते ही मराठी मातीसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे.
श्री ठाणेदार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले की, वयाच्या 24 व्या वर्षी मी अमेरिकेत आलो. येथे छान व्यवसाय केला. त्यानंतर व्यवसायात चांगला जम बसला असताना मला इथल्या लोकांसाठी काही करावे असे वाटले. त्यामुळे मी माझा व्यवसाय विकून टाकला. त्यातून आलेले बरेचसे पैसे मी माझ्या कामगारांना बोनस म्हणून दिले. आता मी राजकारणात उतरलोआहे. महत्त्वाचे म्हणजे माझे राजकारण मी माझ्या पैशांवर करतो. त्यासाठी मी कोणाकडून निधी अथवा देणगी घेत नाही. आता मला येथील नागरिकांसाठी आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण अशा अनेक गोष्टींसाठी काम करायचे आहे. (हेही वाचा, ये हुई ना बात! बाळासाहेब विखे पाटील यांची नात नीला विखे पाटील देणार स्वीडनच्या पंतप्रधानांना सल्ला)
या आधी मी गव्हर्नर पदासाठी निवडणूक लढलो होतो. भारतात मुख्यमंत्री असतात इथे मुख्यमंत्री असतात. ही निवडणूक मी काही वर्षांपूर्वी लढलो. परंतू, मला त्यात यश मिळाले नाही. पण आता मी आमदार म्हणून निवडूण आलो. जे काम मी मुख्यमंत्री (गव्हर्नर) म्हणून काम करायचे ते मी आता मिशिनगमधील लोकांसाठी करेन, असेही श्री ठाणेदार यांनी या वेळी सांगितले.
ठाणेदार यांनी सांगितले की, मी अमेरिकेत असलो तरी आजही मला माझ्या महाराष्ट्राची, बेळगाव, कोल्हापूरची आठवण येते.बेळगावचा कुंदा मला फार आवडतो. अनेकदा मी पुस्तकांसाठी, माझ्या लिखानासाठी भारतात येत असतो.