Prasad Oak Supports Raj Thackrey (Photo Credits: Instagram)

काही दिवसांपूर्वी, आर्थिक घोटाळ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेलेल्या सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनसे अध्यक्ष (MNS Chief) राज ठाकरे (Raj Thackrey) यांना सुद्धा कोहिनुर मिल प्रकरणी (Kohinoor Mill Case) रीतसर नोटीस धाडली होती. यानंतर गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी मुंबईतील ईडीच्या कार्यलयात राज यांची साडे आठ तास चौकशी झाली , यावेळी मुंबईत अनेक ठिकाणी कडक बंदोबस्त करण्यात आला होता. दरम्यान, राज ठाकरे यांना नोटीस आल्याक्षणीपासूनच मनसे कार्यकर्ते, मित्रपक्ष, समर्थक सर्वांनीच विरोधी पवित्रा स्वीकारला होता. ही मंडळी शक्य त्या सर्व माध्यमातून राज यांना पाठिंबा देत सरकार कसे सूड बुद्धीने काम करत आहे याचे दाखले देण्याचाही प्रयत्न करत होती, अशातच काल मराठी अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याने देखील एक खास फोटो शेअर करत राज यांना आपले समर्थन दर्शवले. या फोटो मध्ये प्रसाद हा हुबेहूब राज यांच्या लूक मध्ये बघायला मिळत आहे. तसेच फोटो सोबतच प्रसादचे कॅप्शनही इंस्टाग्राम वर बरीच चर्चेत आहे.

प्रसाद ओक याने काल आपल्या इंस्टाग्राम वरून हा राज ठाकरे लूक मधील फोटो मध्ये त्यांच्या सारखीच एक पोझ दिली आहे, विशेष म्हणजे या फोटोखाली "Thinking About EDitos" असे कॅप्शन लिहित त्याने अतिशय मार्मिकपणे ईडीला टोलवले आहे. (राज ठाकरे यांच्या चौकशीनंतर मनसेची ED ला नोटीस; कार्यालयाबाहेरील फलक मराठीमध्ये लावण्याची मागणी)

प्रसाद ओक पोस्ट

 

View this post on Instagram

 

Thinking about EDiots...😜

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

दरम्यान, ईडीच्या चौकशीमध्ये राज यांनी पूर्णतः सहकार्य केले होते. तसेच आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा भानावर राहण्याचे आदेश दिले होते. गरज लागल्यास पुन्हा राज यांची चौकशी करण्यात येईल असे ईडीतर्फे सांगण्यात आले आहे.