Maratha Reservation  : आजपासून मराठा आरक्षण कायदा राज्यभरात लागू
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

'आता आंदोलन नको, 1 डिसेंबरला जल्लोष करा' असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी  काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला दिले होते. मात्र आजपासून मराठा समाजासाठी(Maratha Samaj) आरक्षण कायदा लागू करण्यात आला आहे.

29 नोव्हेंबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षण कायद्याला विधीमंडळात एकमताने सहमती मिळाली. त्यानंतर 30 नोव्हेंबरला राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर आज 1 डिसेंबर रोजी राजपत्रात अधिसूचना काढण्यात आली आहे. यामुळे मराठा समाज आंदोलकांचा मोठा विजय झाला आहे. तसेच मराठा समाजाला 16ज% शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याची तरतूद विधेकामध्ये मंजूर झाली आहे. तर ओबीसी समाजाला कोणताही धक्का न लावता हा निर्णय घेण्यात आला आहे.(हेही वाचा -Dhangar Reservation: धनगर समाज जल्लोष केव्हा करणार? प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणतात 'तारीख सांगणार नाही')

तर मराठा समाज हा मागासलेपणाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक अशा तिन्ही पात्रता पूर्ण करतो. त्यामुळे मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालामध्ये मराठा समाज हा मागासवर्गीय असल्याचा निष्कर्श काढण्यात आला आहे. मात्र आज मु्ख्यमंत्र्यांनी विधानसभेत कृती अहवाल सादर करुन शुद्धीपत्रक काढून मराठा समाजाचे विधेयक सभागृहात मांडण्यात आले आहे.