Manoj Jarange | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मराठा आरक्षण प्रश्नी आता मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. सगेसोयरे‘च्या प्रश्नी ते पुन्हा उपोषण करणार असल्याचं सांगण्यात आले आहे. 4 जूनला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी मधून उपोषणाला सुरूवात होणार आहे. 4 जूनलाच लोकसभा निवडणूकीचा निकाल देखील जाहीर होणार आहे. दरम्यान आता 20 मे दिवशी महाराष्ट्रात अंतिम आणि 5 व्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याबाबत मनोज जरांगे आग्रही आहेत. सगेसोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा जर अध्यादेश काढला नाही, तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असा मानस देखील त्यांनी व्यक्त केला आहे. आज संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

8 जून दिवशी ते नारायण गडावर सभा देखील घेणार आहेत. Chandrakant Patil Tere Naam Hair Style: चंद्रकांत पाटील फक्त तेरे नाम भांग पाडून फिरतात, त्यांना काय कळतं'? मनोज जरांगे पाटील यांचा हल्ला .

दरम्यान महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकींनंतर विधानसभा निवडणूकीची लगबग सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा उपोषणं केली आहेत. परंतू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील भान ठेवून बोलण्याचे सांगत खडे बोल सुनावले होते. सध्या राज्यात मराठा आरक्षण लागू करण्यात आले आहे. मात्र त्यामध्ये 'सगेसोयरे' समाविष्ट करण्याबाबत मनोज जरांगे पुन्हा आग्रही झाले आहेत.