Maratha Reservation: मराठा आरक्षण मुद्द्यावरुन अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा दोन्ही राजांवर निशाणा, 'बिनडोक' म्हणत एकचा उल्लेख
Prakash Ambedkar on Udayanraje Bhosale And Sambhajiraje | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि संभाजी राजे (Sambhajiraje Chhatrapati) यांचा नामोल्लेख टाळत तीव्र शब्दात टीका केली आहे. मराठा समाजाकडून करण्यात येत असलेल्या मराठा आरक्षण ( Maratha Reservation) मागणी आणि मोर्चाला वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) पाठिंबा दिला आहे. दरम्यान, हा पाठिंबा देत असतानच त्यांनी राजांवर मात्र टीका केली आहे. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, 'एक राजा बिनडोक (Bindok) आहे. त्याला राज्यसभेवर कसा पाठवला हेच कळत नाही', असे म्हटले आहे.ते पुणे येथे बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजास नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात देण्यात येणाऱ्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास स्थगिती दिली आहे. या स्थगितीनंतर मराठा समाजात पुन्हा एकदा अस्वस्थता आहे. मराठा समाज या अस्वस्थतेतून येत्या 10 ऑक्टोबरला पुन्हा एकदा मोर्चा काढणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जाहिर केले की, मराठा समाजाच्या या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. दरमयान, मराठा समाजाचे नेतृत्व दोन्ही राजांनी (उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे संभाजी राजे) करावे अशी मागणी होत आहे, या कडे प्रकाश आंबेडकर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी टीकास्त्र सोडले.

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, 'दोन्हीपैकी कोणत्याच राजाने बंदला पाठिंबा दिल्याचे आमच्या वाचनात नाही. त्यातला एक राजा तर बिनडोक आहे, असेच मी म्हणेन. त्याला राज्यसभेवर कसे पाठवले हेच कळत नाही. दुसरे म्हमजे संभाजी राजे यांनी आरक्षणावर घेतलेली भूमिका बरोबर आहे. पण, ते आरक्षणापेक्षा इतरच गोष्टींवर अधिक भर देत असल्याचे मला दिसत आहे', असे आंबेडकर म्हणाले. (हेही वाचा, Udayanraje Bhonsle On Maratha Reservation: भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचा राज्य सरकारला इशारा '.. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जा')

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर सर्वांचेच आरक्षण रद्द करा अशी भूमका उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली होती. यावर बोलतान प्रकाशआंबेडर यांनी म्हटले की, 'आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर सर्वांचं रद्द करा अशी भूमिका ते मांडतात. त्यांना राज्यघटनाच माहिती नाही. त्यांना राज्यसभेवर पाठवलेच कसे? हेच मला समजत नाही', असा टोलाही आंबेडकर यांनी या वेळी लगावला. यावेळी आपण बोलायला कोणालाच घाबरत नाही, असेही आंबेडकरांनी या वेळी सांगितले.