Robbery | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पालघर (Palghar ) जिल्ह्यातील बोईसर (Boisar) शहरातील मंगलम ज्वेलर्स (Mangalam Jewellers) दुकानावर दरोडा (Robbery) पडला आहे. या दरोड्यात ज्वेलर्समधील जवळपास 10 किलो सोने आणि जवळपास 50 लाख रुपयांची रोखड असा मिळून सुमारे 7 कोटी 60 लाख रुपये किमतीचा माल दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती आहे. दुकान मालक श्रीरंग पाटील यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (Mangalam Jewellers Robbery At Boisar In Palghar) घडल्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पालघर पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

दुकानदाराने दुकान बंद केल्यानंतर पहाटे 3 ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांनी दुकानाची पाठभींत गॅस कटरने कट करुन ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरुन साधारण पाच ते सहा दरोडेखोरांनी हा दरोडा घातल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दुकानाचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्राथमिक तपास सुरु आहे. दुकानदाराने या घटनेबाबत पोलिसांत फिर्यादही दिली आहे. (हेही वाचा, वर्धा येथील मुथूट फायनान्स कार्यालयावर दरोडा घालणारे आरोपी 24 तासांत गजाआड, ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर)

दरम्यान, या आधीही अनेक ठिकाणी दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच वर्धा (Wardha) येथील मुथुट फायनान्स शाखेत दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा (Muthoot Finance Robbery in Wardha Branch) टाकल्याची घटना घडली होती. यात दरोडेखोरांनी 3.18 लाख रुपयांची रोखड आणि तब्बल साडेतीन किलो सोने सोने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. दरम्यान, वर्धा पोलीसांनी तपासचक्रे वेगाने फिरवत संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचाही तपास सुरु आहे.