वर्धा येथील मुथूट फायनान्स कार्यालयावर दरोडा घालणारे आरोपी 24 तासांत गजाआड, 'ही' धक्कादायक माहिती आली समोर
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

वर्ध्यामध्ये (Wardha) काल (17 डिसेंबर) मुथूट फायनान्सच्या शाखेवर (Muthoot Finance Office) सशस्त्र दरोडा घालणा-या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या 24 तासांत या दरोड्याचा छडा पोलिसांनी लावला आहे. वर्ध्यात गुरुवारी सकाळी साडे नऊ च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत 3.18 लाख रुपयांची रोखड आणि तब्बल साडेतीन किलो सोने सोने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. या गुन्ह्याचा योग्य दिशेने तपास करून पोलिसांनी 24 तासांच्या आत या दरोडेखोरांना पकडले. मुख्य म्हणजे या दरोडेखोरांमध्ये या मुथूट फायनान्स शाखेचा व्यवस्थापकही सामील असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, दरोडेखोर बँक कार्यालयात आले. त्यांनी थेट शाखा व्यवस्थापकाजवळ प्रवेश केला. शाखा व्यवस्थापकांच्या कमरेला पिस्तूल लावून त्यांनी चेंबर पेटी खोलली. त्यातून त्यांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केली. दरोडेखोरांनी रोकड आणि सोपत सुमारे साडेतीन किलो सोनेही सोबत घेऊन पोबारा केला.हेदखील वाचा- Bank Robbery In Wardha: वर्धा येथील मुथुट फायनान्स शाखेवर दरोडा; रोख रक्कम, साडेतीन किलो सोने लुटले

मात्र मिळालेल्या माहितीनुसार, यात शाखा व्यवस्थापकही सामील असल्याचे कळाले. थोडक्यात या संपूर्ण प्रकरणात अमिताभ बच्चनच्या 'आँखे' चित्रपटाची झलक पाहायला मिळत आहे.

दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस अधिका-यांनी 4 आरोपींनी अटक केले असून यात शाखा व्यवस्थापकाचा समावेश आहे. या आरोपींकडून एक पिस्तूल, दोन चारचाकी वाहने, तसेच सोने जप्त केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तसेच या आरोपींकडून 9 किलो 700 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.