किर्लोस्कर कन्या मानसी आणि टाटा पूत्र नेव्हिल यांचा साखरपूडा, व्यावसायीक ऋणानुबंध बदलणार नातेसंबंधात
Neville Tata, Manasi Kirloskar | (File Image)

टाटा ट्रेंटचे अध्यक्ष आणि टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक नोएल टाटा यांचे चिरंजीव नेव्हिल टाटा (Neville Tata) आणि टोयोटो किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांची कन्या मानसी किर्लोस्कर (Manasi Kirloskar) यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. या साखरपुड्याची बातम्यांच्या रुपात फारशी चर्चा तशी प्रसारमाध्यमांतून झाली नाही. असे असले तरी नेव्हिल आणि मानसी यांचे चाहते, हिंतचिंतक आदी मंडळींना या दोघांबद्धल त्यांच्या विवाहापर्यंत बरीच माहिती प्रसारमाध्यमांतून मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, एका विवाहामुळे अंबानी आणि पीरामल परिवारातील ऋणानुबंध पुन्हा एकदा जुळले. या विवाहसोहळ्याच्या बातम्या भारतीय प्रसारमाध्यमांनी मोठ्या उत्साहाने दाखवल्या. नेव्हिल आणि मानसी यांच्या विवाहामुळे अशीच संधी भारतीय प्रसारमाध्यमांना पुन्हा एकदा मिळण्याची शक्यता आहे.

चर्चा अशी की, टाटा समूह (Tata Group) आणि किर्लोस्कर समूह (Kirloskar Group) यांच्यातील मैत्री तशी बरीच चुनी. अनेक दशकांची. दोन्ही उद्योग समूह देश आणि विदेशात आपापल्या कर्तबगारीने प्रसिद्ध. त्यातच नेव्हिल आणि मानसी यांचा विवाह जुळला आता तर साखरपुडाही पार पडला. त्यामुळे या दोन्ही समूह आणि परीवारातील संबंध अधिकच घट्ट झाल्याचे मानले जात आहे. साखरपुडा आता पार पडला असला तरी, त्याआधी नेव्हिल यांनी बंगळुरु येथे जाऊन मानसीसाठी लग्नाची मागणी घातली होती.विवाहोत्सुक वर वधू हे आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. नेव्हिल याने ट्रेंट ब्रँडच्या खाद्यपदार्थ विभागात काम केलं आहे. तर, मानसी किर्लोस्कर सिस्टमची कार्यकारी संचालक आहे. (हेही वाचा, टाटांचा नॅनो कारला टाटा; 2020 पासून उत्पादन होणार बंद)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नेव्हिल आणि मानसी यांचा साखरपुडा मुंबई येथील टाटा समूह अपार्टमेंट येते गेल्याच आठवड्यात पार पडला. हे दोघेही येत्या डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकतील अशी शक्यता आहे. नेव्हिल याचे वडील नोएल यांना प्रसारमाध्यमं किंवा इतर माध्यमातून प्रकाशझोतात राहायला आवडत नाही.