
भारतातील सर्वात स्वत कार अशी ओळख असलेली टाटा नॅनो (Tata Nano) आगामी काळात इतिहासजमा होणार आहे. टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमांध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, टाटांचा महत्त्वाकांक्षी असलेली कार टाटा नॅनो ही कार बीए-6 नुसार अपग्रेड केली जाणार नाही. तसेच, या नॅनो कारच्या प्रकल्पात टाटा मोटर्स आता गुंतवणूकही करणार नाही. महत्त्वाचे म्हणजे एप्रिल 2020 पासून कंपनी या कारचे उत्पादनही बंद करणार आहे. टाटा मोटर्सचे वाहन व्यवहार विभागाचे प्रमुख मयंक पारिख यांनी सांगितले की, सध्यास्थितीत नॅनो प्रकल्प गुजरात येथील साणंद येथे सुरु आहे. मात्र, एप्रिल 2020 पासून बीएस-6 लागू झाल्यानंतर हे उत्पादन (अपडेट) अद्यावत करण्यात येणार नाही.
सन 2009मध्ये कंपनीने एक लाख रुपये इतकी या कारची लॉंचीग किंमत ठेवली होती. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत सर्वसामान्यांची कार अशी या करची ओळक बनली. मुळात दुचाकींच्या किमतीत चारचाकी वाहनातून सर्वसामान्यांना प्रवास करण्याची अनुभूती देणे हा उद्देश ठेऊन टाटांनी या कारची निर्मिती केली होती. मात्र, भारतीय वाहन बाजारात या कारला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. बीएस-6 मानकास ध्यानात घेऊन टाटा नॅनोसोबत इतर उत्पादनेही बंद करणार असल्याचेही मयंक पारिख यांच्या हवाल्याने पसारमाध्यमांनी म्हटले आहे. मात्र, नेमकी कोणती उत्पादने टाटा बंद करणार आहेत याबाबत मात्र त्यांनी बोलणे टाळले आहे. बीएस-6 मानक असलेल्या वाहनांना 2020 पासून नोंदणीकृत करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा आदेश म्हणजे ऑटो इंडस्ट्रीसमोर मोठे आव्हान असल्याची चर्चा ऑटोविश्वात आहे. (हेही वाचा, टाटा मोटर्सकडून आपल्या बहुप्रतीक्षित एसयूव्ही – हॅरियरचे अनावरण)
पारेख यांचा हवाला देत प्रसारमाध्यमे पुढे म्हणतात की, टाटांची पाच ते सहा उत्पादनांना बीएस-6 मानके देऊन उत्पादीत केले जाईल. एक एप्रिल 2020 मध्ये बीएस-4 मानक असलेली सर्व उत्पादने कालबाह्य होणार आहेत. गेल्या 36 महिन्यांमध्ये टाटा मोटर्सने ऑटो इंडस्ट्रीत दमदार कामगिरी केली आहे.