मुंबईतल्या प्रभादेवी स्टेशन परिसरात असणाऱ्या एका इमारतीवर जीवघेणारे स्टंट करणाऱ्या 6 विदेशी स्टंटबाज यांना दादर पोलिसांनी अटक केली आहे. तर 14 मजली इमारतींमधील 22 फुटांचे अंतर असलेल्या इमारतीवरुन उड्या मारण्याचा प्रताप हे विदेशी तरुण करत होते.
प्रभादेवी येथील इमारतींवर काही विदेशी तरुण जीवघेणारे स्टंट करत होते. परंतु या स्ंटटबाजी बद्दल कोणालाच माहिती नव्हते. मात्र इमारतीचा सुरक्षारक्षक इमारतीच्या टेरेसवर पाणी सोडण्यासाठी गेला असता तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्वरीत इमारतीमधील नागरिकांनी दादर पोलीस स्थानकात याबद्दल तक्रार नोंदविली. विदेशात या स्टंटबाजीला 'रुफ टॉप जंप' असे संबोधले जाते. मात्र भारतामध्ये असे स्टंट करण्यास बंदी आहे.
@MumbaiPolice daily activity Jumping from one building to another without any protective measures.
Address.- Ambedkar Nagar CHS, Besides India Bulls, Near Prabhadevi Station, Mumbai. Jurisdiction-Dadar Police Station pic.twitter.com/0UKLjXvv5p
— unknown. (@MarioSRK19) November 27, 2018
या प्रकरणी पोलिसांनी विदेशी तरुणांचा शोध घेऊन त्यांना ताज हॉटेलमधून अटक केली आहे. तर या तरुणांना त्यांची स्ंटटबाजी महागात पडली असून त्यांची मायदेशी रवानगी करण्यात आली आहे.