अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (harrassment) केल्याप्रकरणी आरोपीला तब्बल 6 वर्षानंतर 7 वर्षाची शिक्षा झाली आहे. ही घटना 23 एप्रिल 2013 रोजी अकोला (Akola) जिल्ह्यात घडली होती. पीडिताने आपल्या प्रेमाला नकार दिल्यामुळे संतापलेल्या आरोपीने हे धक्कादायक कृत्य केले होते. त्यानंतर पीडिताने हा सर्वप्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसात आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले होते. आरोपीवर गेल्या 6 वर्षांपासून खटला सुरु होता. त्यानंतर आजच्या सुनावणीत आरोपीला 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली.
नागसेन धांडे उर्फ चंदू (35) असे याप्रकरणातील आरोपीचे नाव आहे. चंदू याचे एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होते.यासाठी चंदू संबिधित पीडित मुलीकडे आपल्या प्रेमाची विचारणा केली होती. परंतु, पीडितीने चंदूच्या प्रेमाला नकार दिल्यामुळे तो संतापला होता. त्यानंतर 23 एप्रिल 2013 रोजी पीडित मुलगी ट्युशनवरुन घरी परत असताना चंदूने तिला रस्त्यात अडवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणालाही सांगितल्यास अॅसिड फेकण्याची आणि वडिलांना ठार मारण्याची धमकी, आरोपीने त्यावेळी दिली होती. पीडिताच्या कुटुंबियांनी स्थानिक पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर काही तासांतच आरोपीला अटक केली होती. हे देखील वाचा- धक्कादायक! सासूकडून एनआरआय सुनेची हत्या; पोलिसांत कबूली देण्यासाठी नेला हात कापून
आरोपी आणि पीडित एकाच गावातील रहवासी आहे. आज तब्बल 6 वर्षानंतर आरोपीला शिक्षा झाल्यामुळे अनेकांनी न्याय व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. सध्या हैदराबाद आणि उन्नाव बलात्कार आणि हत्याप्रकरणी देशभरातून संताप वक्त केला जात आहे. तसेच दोषींना थेट फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.