धक्कादायक! सासूकडून एनआरआय सुनेची हत्या; पोलिसांत कबूली देण्यासाठी नेला हात कापून
Image used for representational purpose

आपल्या मुलासह लग्न करुन त्याला अमेरिकेत राहायला घेऊन गेलेला सूनेचा सासूने खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मुंबई (Mumbai) येथील वसई (Vasai) परिसरात घडली आहे. सासूने आपल्या सुनेचा खून करुन कबूली देण्यासाठी मृतदेहाचा हात कापून स्थानिक पोलिस ठाण्यात घेऊन गेली. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून पुढील चौकशीची कसून चौकशी करत आहे. संबधित महिला झोपेच्या गोळ्या खाऊन पोलीस ठाण्यात पोहचली होती. त्यामुळे काही काळानंतर तिची प्रकृती ढासळली. यामुळे तिला पोलिसांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आनंदी माने असे या प्रकरणातील सासूचे नाव असून ती वसई येथे राहायला होती. काहीवर्षापूर्वी आनंदी यांच्या मुलाचे एका एनआरआय रिया नावाच्या तरुणीशी लग्न झाले होते. रिया हि नर्स होती. आनंदी हिला आपल्या सूनेचे नाव आणि नोकरी दोन्हीही आवडत नसे. महत्वाचे म्हणजे, रियाने आपल्या मुलाशी लग्न केल्यानंतर त्याला अमेरिकेत घेऊन गेल्यामुळे आनंदीच्या मनात आधीच राग होता. काहीदिवसांपूर्वी रियाने सुट्टी घेऊन मुंबईत आली. गेल्या आठवड्यात रिया परिवारासह त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नात गेली होती. परंतु, रिया ही घरी परतल्यानंतर झोपेत असताना तिच्या डोक्यात लोखंडी दांडा घालून आनंदीने तिची हत्या केली. हे देखील वाचा- नांदेड: महिलेसोबत अनैतिक संबध ठेवणे एका तरुणाला पडले महागात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पश्चिमेतील ओम नगर येथील माने यांच्या फ्लॅटवर पोलिस गेले असता त्याला बेडरूममध्ये रियाचा मृतदेह आढळला. तसेच उशीवर रक्ताने माखलेला एक पुष्पगुच्छ पडला होता, तर सहा महिन्यांची मुलगी मृताच्या शेजारी झोपली होती. दरम्यान, रियाचा पती रोहन (वय 33) आणि सासरा दत्तात्रेय मॉर्निंग वॉकसाठी गेले. आनंदीचा छोटा मुलगा आणि सून त्यांच्या बेडरूममध्ये होते. पोलिस त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्याला संपूर्ण घटनेची माहिती मिळाली.