Mumbai News: गोरेगावच्या फिल्म सीटीमध्ये एका मालिकाच्या सेटवर एकाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. या अपघातात सेटवर काम करणाऱ्या क्रू मेंबरचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. छोट्या पडद्यावरील मालिकेच्या सेटवर ही घटना घडली. महेंद्र यादव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोशिएशनचे अध्यक्ष सुरेश श्याम गुप्ता यांनी पोलिसांना माहिती दिली.अचानक विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झाला. त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृच घोषित केले.
या प्रकरणात गोरेगाव पोलीस चौकशी करत आहे. सेटवर शॉक लागल्या प्रकरणी सुरेश गुप्ता यांनी महाराष्ट्र सरकारला महेंद्रच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी केली आहे. 'या प्रकरणी प्रोडक्शन हाऊस आणि निर्माता विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महेंद्र यादव यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत करण्यात यावी. तसेच फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि कामगार आयुक्त यांचा राजीनामा तात्काळ घेण्याते येणार आहे' असे ते म्हणाले.