Mumbai-Airport-Runways

Man Died At Mumbai Airport: मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने एका 80 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयत वृध्द हे आपल्या पत्नीसह न्युयॉर्क या शहरातून एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आले होते. सोमवारी ही घटना मुंबई विमानतळावर घडली. पती पत्नी दोघांची तिकिटे व्हीलचेअर प्रवाशांसाठी होते. विमानतळावर व्हीलचेअरच्या कमतरतेमुळे त्यांना फक्त एक व्हीलचेअर मिळाली. या घटनेनंतर विमानतळावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. (हेही वाचा-  मुंबई विमानतळ सहा तासांसाठी बंद

मिळालेल्या माहितीनुसार, जोडप्यामध्ये एकच व्हीलचेअर मिळाली. यानंतर वृध्दाने आपल्या पत्नीला त्या व्हीलचेअरवर बसवून स्वत: पायी चालण्याचा  निर्णय घेतला होता. सुमारे दीड किलोमीटर चालल्यानंतर या वृध्दला ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते इमिग्रेशन येताच जमीनीवर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच, त्यांना तातडीने विमानतळावरील वैद्यकिय केंद्रात नेण्यात आले.तेथून डॉक्टरांनी त्यांना नानावटी रुग्णालयात रेफर केले असता तेथे त्यांचा मृत्यू झाला. मृत वृध्द भारती. वंशाचे असून त्यांच्याकडे अमेरिकन पासपोर्ट होता.

त्याचवेळी एअर इंडियाने या प्रकरणी स्पष्टीकरण देत सांगितले की, व्हीलचेअरला प्रचंड मागणी असल्याने आम्ही प्रवाशाला थोडा वेळ थांबण्याची विनंती केली होती,व्हीलचेअर उपलब्ध होताच त्यांना सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. मात्र वृध्दाने पत्नीसोबत फिरण्याबाबत बोलले होते, एअर इंडियाने सांगितले की, ते पीडितेच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात आहे.