क्षुल्ल्क कारणांवरून 3 अल्पवयीन मुलांना विविस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अंबरनाथ (Ambernath) पश्चिमेतील चिंचपाडा (Chinchpada) भागात शुक्रवारी (19 फेब्रुवारी) घडली आहे. याप्रकरणी एका जणाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहेत. तसेच याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एका मुलाला मोकळ्या मैदानात मारहाण करन जाब विचारताना आरोपी दिसत आहे. या मुलाला विवस्त्र करुन काठीने आणि ठोश्या बुक्क्याने मारहाण केली गेली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी मुख्य आरोपी बाबू उर्फ खोपडी अशप्पा गुंडे याला अटक केली आहे. आरोपी मारहाण करत असताना त्याचे साथीदार व्हिडिओ तयार करत असल्याचे दिसत आहे. क्षुल्लक कारणांवरुन ही मारहाण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर आंबरनाथ परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार सुरु- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला दोन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली. घडलेला हा प्रकार अत्यंत अमानुष असून पोलिसांनी संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळावे, अशी मागणी केली जात आहे.