Maleesha Kharwa: धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या मलिशा खरवा (Maleesha Kharwa) ची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. बस्तीमध्ये राहणारी ही तरुणी एका लक्झरी ब्रँडच्या नवीन कॅम्पेनची ब्रँड अॅम्बेसेडर (Brand Ambassador) बनल्याचे सांगण्यात येत आहे. 14 वर्षांची मलिशा ही मुंबईतील एका छोट्या गावात राहते. जिच्या सौंदर्याने हॉलिवूडच्या कलाकारांनाही तिचे वेड लावले आहे. पाणी आणि विजेशिवाय जगणारी मलिशा 'स्लम प्रिन्सेस ऑफ इंडिया' (Slum Princess Of India) म्हणून प्रसिद्ध आहे. मलिशाचे सोशल मीडियावरही लाखो फॉलोअर्स आहेत. कोण आहे मलिशा खरवा? जाणून घेऊयात...
बऱ्याचदा तुमच्याकडे प्रतिभा असते, मात्र, तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतात. मलिशाच्या बाबतीतही असेच झाले. या गोड चिमुरडीच्या डोळ्यात स्वप्न होतं आणि काहीतरी करण्याची इच्छा होती. पण तिला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. ती मुंबईच्या झोपडपट्टीत सर्वसामान्य मुलांसारखी राहायची. वीज आणि पाण्याशिवाय तिच्या नशिबाने एक सुंदर वळण घेतले आणि ती 'स्लम प्रिन्सेस ऑफ इंडिया' बनली. (हेही वाचा - Mumbai: हुंडा मागणाऱ्या व्यक्तीची मद्यधुंद अवस्थेत गर्भवती पत्नीला मारहाण; गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल)
Forest Essentials नावाच्या ब्रँडसाठी निवड -
अलीकडेच, युवती सिलेक्शन या लक्झरी ब्रँड फॉरेस्ट एसेंशियल्सच्या नवीन मोहिमेसाठी मलिशाची निवड झाली आहे. Forest Essentials ने त्यांच्या नवीन कलेक्शनचा चेहरा म्हणून मलिशा खरवाचा पहिला व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर सौंदर्य असते आणि आम्ही एका वेळी एक संस्कार करत आहोत. हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमन याने मलिशा खारवाचा शोध लावला होता.
हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमन मुंबईत आला तेव्हा त्याने पहिल्यांदा मलिशाला पाहिले. एक म्युझिक व्हिडिओ शूट करण्यासाठी अभिनेता मुंबईत आला होता. पण त्याचवेळी कोविड-19 मुळे त्यांना इथेच राहावे लागले. जेव्हा मलिशाने त्याला तिच्या स्वप्नाबद्दल सांगितले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने मलिशासाठी निधी उभारणीही केली.
View this post on Instagram
त्यानंतर त्याने तिचे इन्स्टाग्राम पेजही तयार केले, ज्याचे आता लाखो फॉलोअर्स आहेत. मलिशा म्हणते, “जेव्हा लोक मला विचारतात की मी एवढी आनंदी कशी आहे हे मला विचित्र वाटते. पण मला माझ्या आयुष्यावर प्रेम आहे. सध्या, माझे आयुष्य मला अशा साहसांवर घेऊन जात आहे ज्यावर माझा विश्वास बसत नाही." आज मलिषा अनेक ब्रँड आणि मासिकांसाठी काम करते.