Mumbai: हुंडा मागणाऱ्या व्यक्तीची मद्यधुंद अवस्थेत गर्भवती पत्नीला मारहाण; गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
प्रतिकात्मक प्रतिमा Abortion | Pixabay.com

Mumbai: चुनाभट्टी पोलिसांनी रविवारी एका 24 वर्षीय तरुणावर गरोदर पत्नीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. श्रुती पोळ या पीडित महिलेने 17 मे रोजी आपल्या पोटात जन्मलेल्या मुलाचा पतीमुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर ही बाब उघडकीस आली. पीडितेने सांगितले की, तिचा पती सौरभ सूर्यकांत पोळ याने 2022 मध्ये लग्नानंतर सहा महिन्यांनी हुंडा दिला नाही असे सांगून तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. या वर्षी मार्चमध्ये गर्भवती राहिल्यावर तिचा नवरा तिच्यावर अत्याचार करणे थांबवेल, असे या महिलेला वाटत होते.

मात्र, 7 मे रोजी सौरभ सायंकाळी घराबाहेर जाऊन दारूच्या नशेत घरी आला. पीडितेने सांगितले की, “जेव्हा मी सौरभला दारू पिण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने माझ्या तोंडावर मारायला सुरुवात केली. तसेच त्याने माझ्या पोटावर वारंवार ठोसे मारले आणि पाठीवर लाथ मारली. आम्ही झोपायच्या आधी त्या रात्री त्याने माझ्यावर पुन्हा हल्ला केला. त्याने माझ्या पोटावर वारंवार ठोसा मारला. (हेही वाचा - Sameer Wankhede, Kranti Redkar यांना सोशल मीडीयावर अश्लील मेसेज, धमक्या मिळत असल्याचा समीर वानखेडे यांचा दावा; विशेष संरक्षणाच्या मागणीसाठी पत्र)

पीडित पत्नीने पुढे सांगितले की, दुसऱ्या दिवशी मला पोटात तीव्र वेदना झाल्या आणि रक्तस्त्राव सुरू झाला. श्रुतीने दावा केला की तिने सौरभला तिची स्थिती सांगितली. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, 9 मे रोजी, जेव्हा तिला वेदना सहन होत नव्हती, तेव्हा तिने तिच्या पालकांना यासंदर्भात कळवले. त्यानंतर पीडितेला तिच्या वडिलांनी तिला कल्याण येथील स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात गेल्यानंतर पीडितेला आपला गर्भपात झाल्याचं समजलं. त्यानंतर श्रुतीने पोलिसात जाऊन पतीविरुद्ध तक्रार नोंदवली.

सौरभला लवकरच अटक करण्यात येणार असून या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. एफआयआरमध्ये सौरभवर कलम 316 (दोषी हत्येचे कृत्य करून न जन्मलेल्या मुलाचा मृत्यू), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे), 498 ए (महिलेचा पती तिच्यावर क्रूरतेने वागणे) आणि 504 या अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.