नागपूर (Nagpur) येथील एमआयडीसीमधील विको कंपनीला (Vicco company) भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. हिंगणा एमआयडीसी परिसरात विकोचा मोठा कारखाना आहे. याच कारखान्यात काल रात्री आग लागली. सुरुवातीला मर्यादित स्वरूप असलेल्या आगीने काही क्षणातच रौद्र रुप धारण केले. या आगीत कारखान्याचा 70 टक्के भाग भस्मसात झाला आहे. सध्या ही आग आटोक्यात आली असून त्या ठिकाणी कुलिंगचे काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी स्थित विको लॅबोरेटरीज कंपनीला काल मध्यरात्री आग लागली होती. यामध्ये कारखान्याचा तळमजला आणि 2 मजळे कोसळून पडले आहेत. घटनास्थळी नागपूर महानगरपालिकेचे 6 तर, नगरपरिषद वाडीचे चार अशा अग्निशमन दलाच्या एकूण दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दरम्यान, बऱ्याच प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून सध्या या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. हे देखील वाचा-Ahmednagar: मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून भाजप तालुकाध्यक्षांचा जावयावर प्राणघातक हल्ला
व्हिडिओ-
नागपुर के एमआईडीसी औद्योगिक परिसर स्थित विको कंपनी के लैब में लग आग अग्निशामक की 6 गाड़िया मौके पर पहुँची पहुंचे नागपुर के एमआईडीसी औद्योगिक परिसर में स्थित विको कंपनी की लैब में यह आग लगी है,लैब से धुआं निकलता देख मौजूद कर्मचारियों ने कंपनी प्रबंधन और दमकल विभाग को इसकी सूचना pic.twitter.com/x9c4DQgaMv
— BHARAT GHANDAT (@BHARATGHANDAT2) March 8, 2021
याआधीही नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील इंडोराम नजीकच्या स्नेहल फार्मा कंपनीला मागच्या सोमवारी (1 मार्च) आग लागली होती. या कंपनीमध्ये औषधाची निर्मिती केली जाते. मात्र, आगीमुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.