महावितरण कंपनीचे ग्राहकांना थकबाकी बिल भरण्याचे आवाहन अन्यथा वीज पुरवठा होणार खंडित
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

कोरोना व्हायरसच्या काळात सर्व व्यवहार बंद झाल्याने ग्राहकांना वीज बिल भरणे थोडे मुश्किल झाले होते. त्याचसोबत वीजेची भरमसाठी बिल आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत अद्याप ती भरलेली नाहीत. याच पार्श्वभुमीवर महावितरण कंपनीने ग्राहकांना थकबाकी बिल भरण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा वीज पुरवठा खंडित होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. डिसेंबर 2020 च्या अखेर पर्यंत राज्यातील एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणाची आर्थिक परिस्थिती ढासळली गेली आहे. यामुळे आता ग्राहकांना काही करुन थकबाकी वीज बिल भरावी लागणार आहेत.

राज्यात गेल्या वर्षातील मार्च महिन्यापासून कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. याच कारणास्तव  लॉकडाऊन  सुद्धा जाहीर केला गेला. परंतु त्या काळात सुद्धा वीज पुरवठा सुरु ठेवला जाईल असा निर्णय महावितरण कंपनीने घेतला होता. या संदर्भात राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी थकबाकी वीज बिल असणाऱ्यांना सुद्धा वीजेचा पुरवाठा कायम सुरु ठेवावा असे स्पष्ट केले होते. (Petrol-Diesel Rate Today: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत किंचितशी घसरण, पाहा मुंबई, पुणे, नाशिक, सिंधुदुर्गासह 'या' जिल्ह्यातील आजचे दर)

तर महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना हप्तांमध्ये बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.  त्यावर अधिक शुल्क आकारणार नसल्याचे ही कंपनीने स्पष्ट केले आहे.  ग्राहकांच्या वीज बिला बद्दल काही तक्रारी असल्यास  त्या सोडवण्याचे आदेश ही दिले गेले आहेत.  परंतु आता महावितरण कंपनी ग्राहकांनी थकबाकी बिल न भरल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावल्याने आता कर्मचाऱ्यांना वेतन देणे मुश्किल होत असल्याचे म्हटले आहे.