शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांतील वादामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीला लाभ होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील मुख्यमंत्री पदाचा वाद इतका विकोपाला गेला की सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीशी हात मिळवणी केली. आणि याच महाशिवआघाडीचा (Shivsena- Congress- NCP) पहिला विजय पाहायला मिळाला आहे कोल्हापुरात.
कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका ऍड सूरमंजिरी लाटकर (Surmanjiri Latkar Kolhapur mayor) यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची इथे गेल्या चार वर्षांपासून आघाडी आहे.
सूरमंजिरी लाटकर यांनी भाजपच्या भाग्यश्री शेतके यांचा 11 मतांनी पराभव करत कोल्हापुरातल्या 49 व्या महापौर बनल्या आहेत.
कोल्हापूर महापालिकेत तर काँग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेना हा 'महाशिवआघाडी' चा फॉर्म्युला यशस्वी झाला. आता तो राज्यात सुद्धा तितकाच यशस्वी होईल का हे बघणं महत्त्वाचं ठरेल.
शरद पवार हे आमचे नेते, लवकरच शिवसेना नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार: संजय राऊत
दरम्यान कोल्हापूर महापालिकेत गेल्या दहा वर्षांपासून अनुसूचित जाती,सर्वसाधारण, ओबीसी,आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित होतं. आताही हे महापौरपद ओबीसी महिलांसाठी आरक्षित झालं होतं. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेत पुन्हा एकदा महिलाराजच पाहायला मिळणार आहे.