Maharashtra Election (FIle Image)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Election 2019) काहीच दिवस शिल्लक राहिले असून आज उेमदवारी अर्ज (Nomination Form) मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सर्वच पक्षांकडून सुरु असल्याचे दिसत आहे. बंडखोऱ्यांचे सर्वात जास्त आव्हान भारतीय जनता पक्ष (Bhartiya Janta Party) आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षाला आहे. त्यामुळे आज कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रिया येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागणार आहे.

मागील लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले होते. येत्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार, असा प्रश्नउपस्थित झाला आहे. या निवडणुकीत बंडखोऱ्याचे सर्वात जास्त आव्हान शिवसेना-भाजपच्या महायुतीला आहे. कारण 27 मतदारसंघामध्ये 114 बंडखोर महायुतीच्या उमेदवारांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे रविवारपासून या बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून सुरु आहे. हे देखील वाचा-युतीसाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी तडजोड केली! पण, मी एकटा कधीही लढू शकतो; उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल 5 हजार 543 उमेदवारांपैकी 4 हजार 743 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने 800 उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत.