महाराष्ट्राच्या हितासाठी तडजोड केली! पण, शिवसेना एकटी कधीही लढू शकते; उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा
Uddhav Thackeray ( Photo Credit: You tube)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Election 2019) आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांकडून प्रचाराची जोरदार सरुवात झाली आहे. यातच शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकतीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत राऊत यांनी युती संदर्भात प्रश्न उपस्थित करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही युती साठी तडजोड केली होती, असे मान्य केले आहे. "मी युतीसाठी तडजोड केली. पण ही तडजोड मी महाराष्ट्रासाठी केली. महाराष्ट्राच्या हितासाठी मी ही तडजोड केली, परंतु मी कधीही एकटा लढू शकतो" असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुलाखती दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक प्रश्नांची विचारणा केली आहे. या मुलाखतीत संजय राऊत यांच्या अनेक थेट प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी बिनधास्तपणे उत्तर दिली आहेत. संजय राऊत यांनी युती संदर्भात प्रश्न निर्माण केला असता उद्धव ठाकरे म्हणाले की,"मी युतीसाठी तडजोड केली. पण ही तडजोड मी महाराष्ट्रासाठी केली. महाराष्ट्राच्या हितासाठी मी ही तडजोड केली. एकदा शब्द दिल्यानंतर मी खेचाखेची करत राहिलो नाही. मला मुख्यमंत्र्यांसह चंद्रकांत पाटील यांनीही अनेकदा सांगितलं की, आमची अडचण समजून घ्या म्हणूनच मी 124 जागांवर लढण्यास तयार झालो. हा आकडा कमी असला तरी राज्यात या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा मला विश्वास आहे. मी सत्तेसाठी युती केली हे देखील सत्य आहे. सत्ता असेल तरच मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी काही तरी करु शकतो. म्हणून मी युती केली. परंतु, मी एकटा कधीही लढू शकतो, असा इशारीही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. हे देखील वाचा-Mahrashtra Assembly Elections 2019: पैठण मध्ये संजय वाघचौरे यांना उमेदवारी न दिल्याने कार्यकर्त्याचे रक्ताचे पत्र; राष्ट्रवादी प्रदेशाध्य्क्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार

उद्धव ठाकरे यांची मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ-

 भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार की नाही? असा प्रश्न अनेकांना पडत होता. परंतु, शेवटच्या क्षणी युती झाल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी अशा प्रश्नांना पूर्णविराम लावला. गेल्या लोकसभा निवडणुकीत हव्या तितक्या जागा न मिळल्याने भाजप आणि शिवसेना पक्षाने  स्वतंत्र निवडणूक लढवली होती.