प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

मुंबईकर मागील काही दिवस थोडा उन्हाचा कडाका सहन करत आहेत. मात्र ह्युमिड झालेल्या वातावरणातून पुन्हा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. येत्या विकेंडला पुन्हा पाऊस बरसू शकतो त्यासोबतच मेघागर्जना आणि वीजांच्या कडकडाटाचा अंदाज हवामान वेधशाळेने वर्तवला आहे. येत्या 36 तासांत कोकण (Konkan), विदर्भ (Vidarbha) आणि मध्य महाराष्ट्रासह (Madhya Maharashtra)  मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई मध्ये येत्या शुक्रवारी, शनिवारी जोरदार पाऊस बरसेल त्यासाठी Yellow Alert देण्यात आला आहे. Mumbai Rains Funny Memes: जोरदार मेघगर्जना, वीजांच्या गडगडाटाने मुंबईकरांनी पहाट झाल्यानंतर सोशल मीडियात मजेशीर मीम्स व्हायरल

मुंबईच्या काही भागांत आज (11 सप्टेंबर) वीजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, मेघगर्जना होऊ शकते असा अंदाज आहे. दरम्यान शनिवारी रायगड सह तळ कोकणापर्यंतच्या पट्ट्यामध्ये अतिमुसळधार पाऊस बरसू शकतो अशी माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी IMD कडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आता जात-जाता पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 13 सप्टेंबरपासून पुढील 4-5 दिवस जोरदार पावसाचा तडाखा बसू शकतो. 11 सप्टेंबरपासून कोकणामध्ये पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता मुंबई वेधशाळेचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

K S Hosalikar यांचे ट्वीट

दरम्यान यंदा महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या 12% अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात यंदा सर्वदूर मुबलक पाऊस झाल्याने पाण्याची चिंता टळल्याची स्थिती आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस बरसला होता. त्यातुलनेत आता सप्टेंबर महिन्यात पावसाने उसंत घेतली आहे. मात्र आता यंदाच्या मान्सूनच्या  शेवटाकडे जाणार्‍या पावसाळा ऋतूमध्ये पुन्हा येत्या काही तासांत तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या ही परिस्थिती महाराष्ट्रासोबतच देशाच्या इतर भागांमध्येही आहे.