Maharashtra Weather Update: येत्या 5 दिवसांत राज्यात तीव्र हवामानाचा इशारा; 23 ते 27 नोव्हेंबर कालावधीत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता
Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार आहे. पुढील तीन दिवस राज्यातील तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात कोरडे हवामान आहे, परंतु आठवड्याच्या शेवटी काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 23 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत किनारपट्टी कोकण प्रदेश आणि गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. पुण्यातील आयएमडीच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी मंगळवारी सांगितले की, ‘जोरदार पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.’

कोरड्या हवामानामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस किमान तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून महाराष्ट्रात आग्नेय दिशेकडून येणाऱ्या दमट हवेचा वेग वाढल्याने दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होऊन दक्षिण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सकाळी गुलाबी थंडी तर काही ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (हेही वाचा: उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय)