Photo Credit -Pixabay

Maharashtra Weather Update: राज्यातील अहमदनगर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट(thunderstorm)सह तुफान पावसाची (Unseasonal rain)शक्यता भारतीय हवामान विभाग (IMD Forecast)कडून वर्तवण्यात आली आहे. मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे तो आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे. तो 30 मे रोजी केरळात दाखल होणार आहे. येत्या 24 तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सूनचा प्रभाव जाणवू शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे. पाऊसकाळात ताशी 30-40 किमी वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे.(हेही वाचा: IMD Heat Wave Alert India: देशभरात उष्णतेची लाट, नागरिकांच्या आरोग्य आणि उपजीविकेवर परिणाम; IMD कडून 'रेड अलर्ट', जाणून घ्या हवामान अंदाज)

मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. कुठे अवकाळी पाऊस पडत होता, तर कुठे तापमानाचा पारा 40 च्या वर गेला होता. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमधील तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. तापमानाचा पारा चाळीसीपार गेल्याने कमालीचा उकाडा जाणवत आहे. मंगळवारी तर जळगाव मध्ये सर्वाधिक 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुसरीकडे साताऱ्यात सर्वात कमी 21 अंश सेल्सिअस तापमानात नोंदवले गेले. दरम्यान, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अशंतः ढगाळ आणि दुपार /संध्याकाळ पर्यंत मुख्यतः निरभ्र राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

मुंबईतील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 अंश सेल्सिअस आणि 29अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. दुसरीकडे दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.