Winter | Photo Credits Twitter

Maharashtra Weather Update Today: राज्यात यंदा चांगलाच पाऊस झाला. त्यामुळे यंदा थंडी देखील तितकीच असणार हे अनेकांचे मत होते. नोव्हेंबरच्या सुरुवातीस राज्यात थंडीला चांगलीच सुरुवात झाली होती मात्र अखेरपर्यंत ही लाट थोडी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता पुन्हा राज्यात कडाख्याची थंडी पडली असून राज्यातील अनेक जिल्हे गारठले आहेत. राज्यात आज सर्वाधिक कमी तापमान विदर्भात (Vidarbh) पाहायला मिळत आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गोंदियामध्ये (Gondiya) तापमान 7.4 अंश सेल्सिअस इतक आहे.

विदर्भात नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे देखील किमान तापमानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातून थंडीचा तडाखा महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारपासून राज्यात कडाक्याची थंडी पाहायला मिळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Winter: महाराष्ट्र राज्यात पुढील 2 दिवसामध्ये 2-3 डिग्री सेल्सियस तापमानामध्ये घट होण्याची शक्यता; IMD चा अंदाज

पाहूयात मुंबई, पुणे, नाशिक सह अन्य जिल्ह्यातील आजचे तापमान (20 डिसेंबर)

जिल्हा  तापमान (अंश सेल्सियस)
मुंबई 20.2
पुणे 12.2
गोंदिया 7.4
यवतमाळ 10.5
नागपूर 8.6
वर्धा 10.2
औरंगाबाद 12.4
परभणी 10.6
बारामती 12.3
सातारा 14.8

मुंबई कुलाबा वेधशाळेनुसार किमान तापमना 21.8 अंश सेल्सियस इतके आहे. वाढत्या थंडीमुळे विदर्भामध्ये काही भागांत किमान तापमानात घट होत आहे. तर यामुळे त्यामुळे गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, अकोला भागांत थंडी वाढली आहे. पुढच्या आठवड्यात मात्र ही थंडी आणखी वाढणार आहे. मुंबईतही सोमवारपासून तापमान आणखी घसरण्यास सुरुवात होईल. यामुळे मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येणार आहे.