महाराष्ट्रात उन्हाच्या झळा लागत असताना आता पुन्हा कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत कमाल तापमानात घट झाली असून सरासरीच्या खाली तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई मध्ये मात्र काल (3 मे ) आठवड्याची सुरूवात मात्र काल दशकातील सर्वात अधिक कमाल तापमान असणार्या महिन्याभरातील दिवसाने झाली आहे. मुंबई त काल कमाल तापमान 36.1 अंश नोंदवण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात पावसाळी स्थिती कायम राहणार आहे.
हवामान विभागाने काल जारी केलेल्या बुलेट्सनुसार राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीटीचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. 4 जिल्ह्यांत ऑरेंज तर 22 जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
के एस होसाळीकर ट्वीट
Severe weather warnings issued by IMD for Maharashtra for 24 hrs.@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/uxnWJRD9Oh
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 3, 2021
महाराष्ट्रात काल (4 मे) रात्री महाबळेश्वर, अहमदनगर जिल्ह्य़ातील कर्जत तालुका, औरंगाबाद, विदर्भातील नागपूर, गोंदिया या भागामध्ये संध्याकाळी पावसाची नोंद झाली. यामुळे रात्रीच्या तापमानामध्येही घट झाली आहे. दरम्यान सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती राज्यात 7 मे पर्यंत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.