Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhansabha Elections) हा यंदाच्या वर्षातील सगळ्यात मोठा हायलाईट होता असे म्हणटल्यास वावगं ठरणार नाही. 2014 साली दिसून आलेल्या भाजपाच्या (BJP) लढतीला शह देण्यासाठी यंदा प्रत्येक पक्षाने शक्य त्या सर्व पद्धती अवलंबल्या, अर्थात त्याचा परिणाम म्ह्णून महाराष्ट्रातील मोठा पक्ष म्हणून ओळखली जाणारी भाजप आता विधानसभेत विरोधी पक्षात विराजमान झाली आहे. या एकूणच संघर्षात सहभागी होताना अनेक उमेदवारांनी अगदी पाण्यासारखा पैसा वाहिला होता असे आता समोर येत आहे, निवडणूक पर्वात झालेल्या खर्चाची आकडेवारी पाहिल्यास उत्तर कऱ्हाड मतदारसंघातून सर्वात जास्त म्हणजेच 26 लाख 84 हजार 86 रुपये इतका खर्च एका उमेदवाराने केल्याचे समजत आहे. या उमेदवाराचे नाव मनोज घोरपडे (Manoj Ghorpade) असे असून त्यांनी अपक्ष तिकिटावर निवडणूक लढवली होती.

कऱ्हाड मधील अन्य उमेदवारांच्या खर्चाचे आकडेही असेच थक्क करणारे आहेत. घोरपडे यांच्या पाठोपाठ शिवसेना उमेदवार धैर्यशील कदम यांनी 21 लाख 12 हजार, शेखर गोरे यांनी 19 लाख 98 हजार, भाजपच्या अतुल भोसले यांनी 17 लाख 80 हजार, अपक्ष उदयसिंह पाटील यांनी 16 लाख 50 हजार इतका खर्च सादर केला आहे. यासोबतच काही दिग्गज नेते मंडळी जसे की, राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील यांनी 16 लाख 96 हजार तर, काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी 20 लाख 52 हजार इतका खर्च सादर केला आहे. याशिवाय माण मधून जयकुमार गोरे यांच्या खर्चाचा आकडा सुद्धा 20 लाखांच्या घरात आहे.

संबधित उमेदवारांनी आपल्या खर्चाची कारणे देताना पक्षश्रेष्ठी आणि मोठ्या नेत्यांच्या सभांचे खर्च सादर केले आहेत. कऱ्हाड मधील पाच भाजप उमेदवारांनी आपला खर्चाचा तपशील देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला प्रत्येकी 3 लाखाहून अधिक खर्च दाखवला आहे तर बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार यांच्या सभेत 56 हजार हुन अधिक झाल्याचे सांगितले. फलटण येथे अमोल कोल्हे यांच्या सभेसाठी राष्ट्रवादी उमेदवाराने सुद्धा 1 लाख 65 हजाराचा खर्च दाखवला.

Paytm युजर्स सावधान! स्मार्टफोनमध्ये 'हे' अ‍ॅप असल्यास बँक खात्यामधून चोरी होतील पैसे

एकीकडे, आयोगाच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत 28 लाख इतक्या खर्चाची परवानगी होती. तर दुसरीकडे, प्रति उमेदवार झालेल्या खर्चाने एकत्रित रित्या मोठा आकडा गाठल्याचे स्पष्ट होत आहे.