महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election) महायुती (Mahayuti) चा यंदा दमदार विजय झाला आहे. सुरूवातीच्या कलांपासूनच महायुती आघाडी वर होती. आता निकालांमध्येही त्यांचा दबदबा दिसत आहे. दरम्यान यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही' असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे महायुती मध्ये मुख्यमंत्री पदावर कोण बसणार याची चर्चा सुरू असताना आता शिंदेंच्या वक्तव्यांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
म्हायुती मध्ये एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात असताना आता एकनाथ शिंदे यांनी अजून सारे निकाल समोर आलेले नाहीत. निकालानंतर तिन्ही पक्ष एकत्र बसतील आणि मुख्यमंत्रीपदाचा पुढील निर्णय घेतील असे ते म्हणाले आहेत. मीडीयाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान महायुतीच्या दणदणीत विजयाचं देखील त्यांनी कौतुक केले आहे. कार्यकर्त्यांना पेढे भरवत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच मतदार आणि लाडक्या बहिणींचे त्यांनी आभार मानले आहेत. Maharashtra Assembly Election Results 2024: विधानसभा निवडणूक निकाल, गिरीश महाजन, कालिदास कोळंबकर, आदिती तटकरे यांच्यासह कोण कोण जिंकले? घ्या जाणून .
एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
#WATCH | Thane | Maharashtra CM & Shiv Sena leader Eknath Shinde says, "Let the final results come in...Then, in the same way as we fought elections together, all three parties will sit together and take a decision (on who will be the CM)." pic.twitter.com/q6hxe8Wyvn
— ANI (@ANI) November 23, 2024
. त्यामुळे आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल याची उत्सुकता वाढली आहे.
सध्या कलांमध्ये महायुती 222 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे तर महाविकास आघाडी 56 जागांवर आघाडीवर आहे.