महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 14,718 रुग्ण आढळून आले असून 355 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोविड19 चा आकडा 7,33,568 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात सध्या 5,31,563 रुग्णांची प्रकृती सुधारली असून एकूण 23,444 वर पोहचला आहे. त्याचसोबत 1,78,234 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तर राज्यात लॉकडाऊन हळूहळू उठवला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाकडून सुद्धा खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश दिले जात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. कोविड योद्धे सुद्धा कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.(महाराष्ट्रात 1 सप्टेंबरपासून व्यायाम शाळा, मंदिर सुरु होणार? राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष)
14,718 new #COVID19 cases and 355 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases now stands at 7,33,568 including 5,31,563 recoveries and 23,444 deaths. Number of active cases 1,78,234: State Health department pic.twitter.com/iFWUuhfBoQ
— ANI (@ANI) August 27, 2020
दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा जरी वाढत असला तरीही मृत्यूदर कमी झाल्याचे दिसून आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले होते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मिशिन बिगिन अगेननुसार टप्प्याटप्प्याने काही गोष्टी सुरु करण्यास सराकरने परवानगी दिली आहे. परंतु अद्याप मंदिरे आणि जीम सुरु न करण्यात आल्याने नागरिकांकडून नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे.