महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत असताना नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यात गेल्या काही दिवासांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यामुळे राज्यात पुन्हा लाकडॉऊन (Lockdown) लागणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. यासंदर्भात नुकताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नागरिकांशी संवाद साधला होता. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. तसेच लॉकडाऊन हा शेवटचा प्रर्याय असल्याचे त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
"महाराष्ट्रात काही प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ही संख्या 400-500 ने वाढत आहे. तर, 300ने कमी होत आहे. राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून दररोज 2500-3000 रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून किरकोळ स्वरुपात याची वाढ होताना दिसत आहे. यामुळे चिंता करण्याची गरज नाही. परंतु, नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत, तिथे या उपाययोजना केल्या जातील. मात्र, लॉकडाउन हा सर्वात शेवटचा पर्याय असेल," असे राजेश टोपे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये पुन्हा कोरोना विषाणू संसर्गामध्ये वाढ, लागू शकतो लॉकडाऊन; जाणून घ्या शहरातील काही महत्वाच्या Hotspot ची यादी
कोरोना विषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिले आहे. दरम्यान, मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
राज्यात आज 3 हजार 663 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2 हजार 700 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 19 लाख 81 हजार 408 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 37 हजार 125 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.66% झाले आहे.