Maharashtra's First Robotic Nipple-Sparing Mastectomy Surgery

Maharashtra's First Robotic Nipple-Sparing Mastectomy Surgery: वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण प्रगती घडवून आणणारी बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील (New Mumbai) अपोलो कॅन्सर सेंटर (Apollo Cancer Centre) ने महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक निपल-स्पेअरिंग मास्टेक्टॉमी (Robotic Nipple-Sparing Mastectomy) (आरएनएसएम) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. कर्करोग हा जागतिक स्तरावर मनात भिती निर्माण करणारा आजार आहे. पण या येणाऱ्या अव्हानांना सामोरे जाण्याकरिता कर्करोग निदान (Cancer Diagnosis) तंत्र आणि तंत्रज्ञानातील आधुनिकता ही लवकर निदान करण्याचा दर, आयुष्याचा दर्जा सुधारणे आणि कर्करोगाचा काळाजीमधील दरी भरून निघण्यासाठी उपयुक्त ठरते.

या कर्करोगाचा विरोधातील लढाईमध्ये, उपचारांचे प्रकार बदलत जातात आणि त्याकरिता अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे कर्करोगाचा उपचार कितीतरी प्रमाणात पुढे गेला असून रूग्णाचा आयुष्याचा दर्जा सुधारताना दिसतो आहे. या आधुनिकतांसह, कर्करोगाचा शस्त्रक्रियेमध्ये रोबोटिक निप्पल-स्पेअरिंग मॅसेक्टॉमी (आरएनएसएम) टीलूपसह एकत्रित केल्याने इम्प्लान्टमध्ये दिसून येणारी सुधारणा ही थक्क करणारी आहे. (हेही वाचा - Cancer Vaccine For Women: देशातील 9 ते 16 वर्षे वयोगटातील मुलींना मिळणार कर्करोगाची लस; येत्या पाच ते सहा महिन्यांत होणार उपलब्ध)

महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक निप्पल-स्पेअरिंग मॅसेक्टॉमी पुनर्रचना -

अपोलो कॅन्सर सेंटर, नवी मुंबईने यशस्वीपद्धतीने महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक निप्पल-स्पेअरिंग मॅसेक्टॉमीची पुनर्रचना ही टीलूपचा वापर करून केली आहे- ही प्रक्रिय कर्करोगाचा प्रतिबंध आणि पुनर्रचनेमधील एक अग्रगण्य प्रक्रिया ठरली आहे. या यशामुळे ऑन्कोलॉजी सुरक्षितता आणि रूग्णांकरिता सौंदर्य अनुभवामध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिकता विकसित झाली आहे. (हेही वाचा: Prayagraj Mahakumbh 2025: महाकुंभातील पाणी आंघोळीसाठी योग्य नाही; संगमातील Faecal Coliform बॅक्टेरियाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले, CPCB अहवालातून समोर आली धक्कादायक बाब)

ही शस्त्रक्रिया यशस्वी पद्धतीने नवी मुंबई येथील, अपोलो कॅन्सर सेंटर चे कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. संदिप बिप्ते यांचा मार्गदर्शनाखाली इतर निपुण अशा चिकित्सकांचा समूहाद्वारे करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, 43 वर्षांचा महिलेला 2024 साली उजव्या स्तनाचा कर्करोगाचे निदान करण्यात आले. त्यांचा वयाचा विचार करता, जनेटिक चाचण्याकरण्यात आल्या. ज्यामध्ये बीआरसीए जीन पॉझिटिव असल्याचे लक्षात आले, ज्यामुळे त्यांचा डाव्या स्तनाला देखील 70-80% प्रमाणात कर्करोग होण्याचा धोका संभवत होता. सहा महिन्यापुर्वी उजव्या स्तनाची ब्रेस्ट-कन्झर्विंग शस्त्रक्रिया झाल्यानंतर, मोठ्या रिकन्स्ट्रक्टिव शस्त्रक्रियेचा भितीने त्यांना डाव्या स्तनाची प्रोफ़ायलॅक्टिक मॅसेक्टॉमी करायची भिती वाटत होती. पण, दुसऱ्या स्तनाला कर्करोग होण्याची भिती मात्र तशीच होती.

दरम्यान, रोबोटिक निप्पल-स्पेअरिंग मॅसेक्टॉमी बद्दल महिला रुग्णानाने त्वरीत डॉ.बिप्ते यांचाशी संपर्क साधला, तेंव्हा डॉक्टरांनी आरएनएसएममुळे त्यांना मिळणारी सुरक्षितता, परिणामकारकता आणि उत्तम सौंदर्य उपलब्धींबद्दल आश्वसत केले- ही एक आधुनिक पद्धती असून याची रचना विशिष्ट पद्धतीने बीआरसीए- पॉझेटिव महिलांमध्ये प्रोफ़ायलॅक्टिक स्तन शस्त्रक्रिया म्हणून करण्यात आली आहे.

होणाऱ्या लाभांचा अंदाज आल्यानंतर, त्यांनी त्वरीत टीलूपसह आरएनएसएम रिकन्स्ट्रक्शन शस्त्रक्रिया जानेवारी करून घेतली. चार तास चललेल्या या शस्त्रक्रियेमुळे त्यांना उत्तम सौंदर्य उपलब्धता मिळाली आहे. याशिवाय त्यांना दुसऱ्याच दिवशी दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले. या शस्त्रक्रियेत त्वचेचे आणि निप्पलचे संरक्षण केले गेले, तसेच स्तन नैसर्गिक स्वरूपात राहिले आणि उत्तम सौंदर्य उपलब्धी मिळाली. या शस्त्रक्रियेत महिलेला खूप कमी त्रास झाला.