Coronavirus Outbreak In Maharashtra: महाराष्ट्रात आज तब्बल 322 कोरोनाबाधितांचा मृत्यू; तर 9 हजार 601 नव्या रुग्णांची नोंद
Coronavirus in India | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात आहेत.  महाराष्ट्रात आज आणखी 9 हजार 601 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 322 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 31 हजार 719 वर पोहचली आहे. यापैंकी 15 हजार 345 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. ज्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.  हे देखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,059 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,15,346 वर

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव महाराष्ट्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी मिशेन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात देण्यात आलेल्या सवलतींसह 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. दिलासादायक म्हणजे, राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याच्या दरात आणखी सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळते आहे.