Ram Kadam, Sanjay Raut (PC - ANI)

Maharashtra: शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राउत यांनी केंद्र सरकारवर असा आरोप लावला की, महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव टाकला जात आहे. तसेच त्यांनी असा ही दावा केला की, मला ईडीच्या जाळ्यात अडकवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जात आहे. राज्यसभेचे खासदार संजय राउत यांनी याच संदर्भात सभापती वेंकैया नायडू यांना पत्र लिहून त्यात हे आरोप आणि दावे केले आहेत. यावरच आता भाजप नेते राम कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राउत यांच्या ट्विटवर भाजप नेते राम कदम यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी असे म्हटले की, जी लोक चुकीची काम करतात त्यांना भीती वाटते. तसेच महाराष्ट्रातील सरकार मधील काही नेतेमंडळी घाबरलेली आहेत. जर त्यांनी कोणताही आर्थिक घोळाटा केला नाही तर ते का घाबरत आहेत?(महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी संपर्क; विरोधकांचा छळ करण्यासाठी केंद्र सरकारकडून ED चा वापर होत असल्याच्या आरोपाचं Sanjay Raut यांच्याकडून राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना खळबळजनक पत्र)

Tweet:

दरम्यान, राउत यांन वेंकैया नायडू यांना पत्र लिहित असे म्हटले की केंद्र सरकार आणि तपास एजेंसींचा चुकीचा वापर केला जात आहे. तर जवळजवळ एका महिन्यापूर्वी काही लोकांनी मला संपर्क केला आणि ठाकरे सरकार पाडण्यासाठी आम्हाला मदत करा असे त्यांनी म्हटले. यासाठी जेव्हा मी नकार दिला तेव्हा मला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली गेली.